PM Kisan Mandhan Yojana, या शेतकऱ्यांना मिळणार 3000 रु प्रतीमहा

शेतकऱ्यांना मिळणार केंद्र सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन, पिएम किसान मानधन योजना!

जाणून घेऊयात पात्रता अन् अटी

PM Kisan Mandhan Yojana
Image by Meta AI
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana: पी एम किसान मानधन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे दरमहा 3000 रुपये पेन्शन देऊ करणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना 55 रुपये ते दोनशे रुपये याचा प्रीमियम भरावा लागणार आहे.

 

PM Kisan Mandhan Yojana पी एम किसान मानधन योजना माहिती

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी सहा हजार रुपये पाठवत आहे. प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपये असे एका वर्षात एकूण सहा हजार रुपये केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्यांना देऊ करत आहे. आत्तापर्यंत एकूण 17 हप्त्यात एकूण रक्कम 34 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठविण्यात आले आहेत.

पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana ही योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना ठरणार आहे.

पीएम किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महा प्रत्येकी 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आहे? योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते? आता आपण हे जाणून घेणार आहोत.

 

पी एम किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana नेमकी काय?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जाणार आहेत. पी एम किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana  ही ऐच्छिक योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये इतकी रक्कम जमा करावी लागते.

शेतकऱ्याच्या वयाचे एकूण 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये इतकी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.

हेही वाचा:- Shetkari Yojana 2024, शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र, 90% पर्यंत सबसिडी

प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana कशी चालू करावे?

  • नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी नोंदणी करता येऊ शकते.
  • नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य निवडून ऑफिसर यांच्याकडून या योजनेची नोंदणी करताना ती निशुल्क नोंदणी असेल.
  • शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन असणे आणि बँक अकाउंट खाते असणे गरजेचे आहे.
  • 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकते.
  • शेतकऱ्यांचे 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल.
  • केंद्र सरकार देखील या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल.
  • या योजनेचा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे एकूण दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केले असल्याची माहिती मिळते

Crop Insurance कसे करावे 2024? अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान?

पीएम किसान मानधन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक
  3. मोबाईल नंबर

फक्त इतकीच महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana अर्ज कसे करावे?

पैसे किती जमा करावे लागतील? तर ज्या शेतकरी बांधवांचे वय हे 18 वर्षे असेल त्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यासाठी दरमहा फक 55 रुपये इतकी रक्कम जमा करावी लागणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची वय हे 40 वर्ष असेल त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दरमहा 200 रुपये इतकी रक्कम जमा करावी लागणार आहे.

सेतू सेवा केंद्र किंवा आपले सरकार सुविधा केंद्रात जाऊन आपल्या सोयीनुसार उपलब्ध होणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आपण आपला अर्ज भरू शकतो.

तसेच ग्रामपंचायत संगणक परिचालक किंवा देशातील निवडक पोस्ट ऑफिस तसेच शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या निवडक बँकेतही नोंदणीची सोय केलेली आहे.

हेही वाचा :- Maharashtra Swadhar Yojana 2024, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024, सरकार कडून मिळणार 51000 रूपयाची मदत…

रजिस्ट्रेशन कसे करावे?

  1. पी एम किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना प्रथम त्याच्या जवळील माही सेवा केंद्र किंवा सर्विस सेंटर मध्ये जावे लागेल.
  2. यानंतर शेतकऱ्यांना स्वतःचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि त्यांच्या जमिनीची कागदपत्रे त्या केंद्रात जमा करावी लागणार आहेत.
  3. याशिवाय आपले बँक खात्याची सर्व माहिती द्यावी लागणार आहे.
  4. यानंतर शेतकऱ्यांना तिथे सापडलेले अर्ज त्यांच्याबरोबर आधार लिंक करावे लागेल व त्यानंतर पेन्शन खाते क्रमांक दिले जाईल.

पी एम किसान मानधन PM Kisan Mandhan Yojana  योजनेची पात्रता :

  1. पीएम किसान मानधन योजनेचा PM Kisan Mandhan Yojana  लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती जमीन असणे आवश्यक आहे.
  2. जो शेतकरी या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे तो शेतकरी अल्पभूधारक असणे गरजेचे आहे.
  3. एकूण 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
  4. शेतकऱ्यांचे वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत एकूण 3 हजार रुपये इतकी रक्कम पेन्शन मदत म्हणून दिली जाईल.

पीएम किसान सन्मान योजना 18 वा हप्ता कधी मिळणार?

प्रधानमंत्री किसान योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता 18 वा हप्ता असणार आहे. पी एम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दीपावली गोड करण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केली जाणार असल्याची शक्यता आहे.

यादरम्यान महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी  महा योजना अंतर्गत योजना अंतर्गत राज्य सरकारकडून देखील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये जमा होत आहेत. आतापर्यंत एकूण चार हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपये मिळत आहेत. केंद्र सरकारकडून येणारे एकूण 6 हजार रुपये व राज्य सरकारकडून येणारे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी जमा करण्यात येत आहेत.

PM Kisan Mandhan Yojana
Image by Meta AI

वाचा :- https://maandhan.in/

हेही वाचा:- Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900

व्हिडिओ पहा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “PM Kisan Mandhan Yojana, या शेतकऱ्यांना मिळणार 3000 रु प्रतीमहा”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now