महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक अशा योजना राबवल्या आहेत. ज्यात अनेक योजना महिलांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, राबविल्या आहेत. आता सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Swadhar Yojana 2024 महाराष्ट्र स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
स्वाधार(Maharashtra Swadhar Yojana) योजना कोणासाठी?
महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. ज्यामध्ये अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 51 हजार रुपये ही रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी शैक्षणिक साहित्यासाठी खर्च करण्याची मदत सरकारकडून केली जाणार आहे.
(Maharashtra Swadhar Yojana) योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारकडून स्वाधार (Maharashtra Swadhar Yojana) योजनेची सुरुवात केली गेली आहे. महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्या शहरात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये राहण्याची सुविधा दिली जाते. इतर ठिकाणी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सुविधा या योजने मार्फत करण्यात येत आहे.
(Maharashtra Swadhar Yojana) स्वाधार योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात?
स्वाधार योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आले आहेत. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी दहावी आणि बारावी या कोणत्याही कोर्समध्ये ऍडमिशन घेत असेल तर त्याचा कालावधी दोन वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
स्वादर योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. व तसेच त्याचे स्वतःचे बँक अकाउंट असावे.
स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचा खर्च म्हणून 28 हजार रुपये दिले जाणार आहेत. लॉजिंग सुविधेसाठी एकूण पंधरा हजार रुपये दिले जातील. तसेच मेडिकल आणि इंजीनियरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त म्हणून पाच हजार रुपये जास्तीचे मिळणार आहेत.
(Maharashtra Swadhar Yojana) अर्ज कसा करायचा?
- स्वाधार योजना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- महाराष्ट्र समाज कल्याण विभा गाच्या होम पेजवर असलेल्या स्वाधार योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
- यानंतर पुढे त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.
- यानंतर आपल्या जवळील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हा फॉर्म जमा करावा लागेल.
- यानंतर या फॉर्मची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
नवीन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी माहिती.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव
- विद्यार्थ्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव
- विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर
- विद्यार्थ्यांचा आधार कार्ड
- विद्यार्थ्यांची जन्मतारीख
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय
- अर्जदाराचे लिंग
- आईचे पूर्ण नाव
- अर्जदाराचा मूळ पत्ता
- अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी प्रमाणपत्र
- सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले जात प्रमाणपत्र
- सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वडिलांचे किंवा पालकांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- शैक्षणिक गॅप असल्यास प्रमाणपत्र
- शिक्षण घेत असलेला जिल्हा
- शिक्षण घेत असलेले अभ्यासक्रम
- शिक्षण घेत असलेला वर्ग
- अर्जदाराने प्रवेश घेतलेला कॉलेज महाविद्यालयाचे नाव
- शिक्षण घेत असलेली शाखा (Art, Sci, Com)
- कॉलेज महाविद्यालयातील नोंदणी क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक
- इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
- शैक्षणिक प्रवेश वर्ष व दिनांक
- उत्तीर्ण महिना व वर्ष
- प्राप्त गुण
- एकूण गुण
अशाप्रकारे विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.
विद्यार्थ्यांच्या बँकेची माहिती:-
- विद्यार्थ्यांच्या पासबुक वरील पूर्ण नाव
- राष्ट्रीयकृत बँकेचे नाव
- बँकेची शाखा
- बँक खाते क्रमांक
- बँकेचे IFSC कोड
(Maharashtra Swadhar Yojana) स्वाधार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे? अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे कोणती?
- अर्जदार विद्यार्थ्यांचा फोटो
- अर्जदार विद्यार्थ्यांची सही
- अर्जदाराच्या जातीचा प्रमाणपत्र
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक वरील पहिल्या पानाचे झेरॉक्स, नाव अकाउंट नंबर
- तहसील चे उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी जिओग्राफिक लोकेशन केलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
- कॉलेज किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- बँक खात्यासोबत आधार क्रमांक संलग्न केल्याबाबतचा पुरावा
- शेवटच्या शिकलेल्या वर्गाची टीसी दाखला प्रमाणपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- मेस किंवा खानावळ याची बिल पावती
- उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
- मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत झेरॉक्स कॉपी
- शपथ पत्र किंवा हमीपत्र
- भाड्याने असल्यास करारनामा.
स्वाधार योजना रिन्यूअल अर्ज व लागणारी कागदपत्रे?
- चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- मागील वर्षाचे गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
- भाड्याने असल्यास करारनामा झेरॉक्स प्रत
- रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
- मेस किंवा खानावळ याचे बिल पावती
- रिन्यूअल अर्ज सादर करत असल्यास हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही
ऑनलाइन माहिती भरत असल्यास अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडणारी कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून ती आपल्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जमा
(Maharashtra Swadhar Yojana) स्वाधार योजनेचा शपथपत्र किंवा हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
व सोबतच सॅम्पल भाडे पावती डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f
Maharashtra samaj Kalyan official website
महाराष्ट्र समाज कल्याण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sjsa.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024
Mukhymantri Yuva karya prashikshan Yojana 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 चे अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
हेही वाचा :- Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना 2024
Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900
https://marathinewstime.com/mukhumantri-yuva-prashikshan-yojana/?amp=1
(Maharashtra Swadhar Yojana)
Swadhar Yojana online form
Swadhar Yojana form
Swadhar Yojana 2024 last date
स्वाधार योजना कागदपत्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
3 thoughts on “Maharashtra Swadhar Yojana 2024, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024, सरकार कडून मिळणार 51000 रूपयाची मदत…”