महाराष्ट्र विधानसभा निवडणुक बिगुल वाजला, Maharashtra Assembly Election 2024

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना Maharashtra Assembly Election 2024 चांगलाच वेग आला आहे. राज्यातील राजकारण्यांसोबतच राज्यातील जनतेला ही मोठी उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील राजकारणात विविध मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

एकीकडे पक्ष आणि विपक्ष यांच्यात जागावाटप बाबत चर्चा चालू असतानाच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? अश्या चर्चेला मोठा वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार? असा मोठा प्रश्न राज्यातील राजकारण्यांना पडला आहे. याबाबत मोठी माहिती निवडणुक आयोगाकडून आली आहे.

हेही वाचा : आयुष्मान कार्ड (Ayushman Card) 5 लाख पर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज

 

Maharashtra Assembly election 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रित निवडणुक आयोग करणार महाराष्ट्र दौरा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अवघ्या काहीच दिवसावर येऊन ठेपले असतानाच “विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा” असे विधान केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. याबरोबरच राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. येत्या 26 सप्टेंबर 2024 तारखेपासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम पुढील चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या होणाऱ्या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची एक टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा केली जाणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. येत्या 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी राजधानी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येथे गुरुवारी म्हणजे 26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईला येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला सकाळी सर्व राजकीय पक्षासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर त्याच दिवशी एक वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. या नंतर  दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, गुप्तचर यंत्रणा, आयकर विभाग, ईडी, सीबीआय या मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाची बैठक होणार आहे. या सर्व बैठकीमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणुक याबद्दल महत्त्वाचा आढावा घेतला जाईल.

 

विधानसभा निवडणुक कधी जाहीर होणार?

केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक साठी (Maharashtra Assembly Election 2024) किती पोषक वातावरण आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती निवडणूक आयोग जाणून घेईल. त्यानंतर 28 सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. यानंतर दुपारी 04:00 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय जाहीर करेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण्यांसोबत जनतेचेही लक्ष असणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा महत्त्वाचा दौरा मानला जातोय. चार दिवसीय महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : PM Kisan Mandhan Yojana, या शेतकऱ्यांना मिळणार 3000 रु प्रतीमहा

 

येणाऱ्या ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबर 2024 पासून म्हणजेच पुढील महिन्यापासून राज्यात आचार संहिता लागू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र सोबतच झारखंड विधानसभेच्या निवडणुका देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळेच पक्ष जोरदार तयारीला सुरुवात करणार आहेत.

 

निवडणुकी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा

अवघ्या काहिक दिवसाच्या अंतरावर निवडणूक तोंडावर येवून ठेपली असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होणार आहे. पुण्यातील नवीन भूमिगत मेट्रोचे उद्घाटन करतील त्यासोबतच  26 सप्टेंबर रोजी उन्नत मार्गाची पायाभरणी करणार असल्याचे माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरेल असे म्हणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक सोबतच जनतेचेही लक्ष असणार आहे. महाराष्ट्रासाठी ऐक निवणुकिपूर्वी कोणत्या मोठ्या केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या दिवशी जमा होणार!

 

राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) यांची घोषणा लवकरच होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला लागले असे निवडणूक आयोग कडून कळविण्यात आले आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी जागावाटप बद्दल आपापले फॉर्म्युला ठरवताना दिसत आहेत. अनेक राजकारणी आपापल्या पद्धतीने सीट निश्चित करण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळे सर्वच पक्ष आणि नेते चांगल्याच तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा:- 3 फ्री गॅस सिलेंडर, वाचा, Maharashtra Annapurna Yojana, महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना…

वाचा:- विधानसभा निवडणूक 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “महाराष्ट्र विधानसभा निवडणुक बिगुल वाजला, Maharashtra Assembly Election 2024”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now