3 फ्री गॅस सिलेंडर, वाचा, Maharashtra Annapurna Yojana, महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना…

(Maharashtra Annapurna Yojana)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Annapurna Yojana : महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना : महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील महिलांसाठी एक नवीन आणि महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे नाव ‘महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना’ (Maharashtra Annapurna Yojana) असे आहे. लाडकी बहीण योजने नंतर आता एक नवीन योजना महाराष्ट्र सरकार कडून राबिविली जात आहे.

महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना (Maharashtra Annapurna Yojana) या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या कुटुंबाला एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि निकष आहेत. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती आणि पात्रता व निकष समजून घेणार आहोत.

हेही वाचा:- Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या दिवशी जमा होणार!

 

महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना (Maharashtra Annapurna Yojana) उद्देश :

महाराष्ट्र अन्नपूर्णा योजना या योजनेचा मुख्य उद्देश्य हा ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे हा आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करताना दुरापासून होणाऱ्या आजारापासून महिलांचे संरक्षण व्हावे हे देखील या योजनेचे एक मुख्य उद्देश्य आहे.

वेळोवेळी गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या परिवारावर मोठा भार पडतो. म्हणून या योजनेद्वारे महिलांना मोफत गॅस सिलेंडर देऊन कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना पात्रता (Maharashtra Annapurna Yojana):

महाराष्ट्र अन्नपूर्णा योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि निकष करण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात पात्रता आणि निकष काय आहेत. प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येक महिलेला हा लाभ मिळवता येणार नाही. यामुळे या योजनेची पात्रता जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

  1. कुटुंबातील महिलेच्या नावावर गॅस कलेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना (Maharashtra Annapurna Yojana) या योजनेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे गॅस कलेक्शन हे महिलेच्या नावावर असणे अत्यंत आवश्यक आहे. जर गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावे असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर गॅस कलेक्शन हे महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  2. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना लाभ घेतलेले महिला असणे आवश्यक आहे. जर कुटुंबातील महिला ही ‘प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना’ या योजनेचा लाभ मिळवत नसेल तर ‘महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना’ या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही. यामुळे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेत असणे आवश्यक आहे.
  3. एक रेशन कार्ड एकच लाभार्थी. महाराष्ट्र अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला लाभ घेता येईल. म्हणजेच एका रेशन कार्डावरून फक्त एकाच महिला या योजनेसाठी पात्र असेल. जर एका कुटुंबामध्ये दोन वेगवेगळ्या महिलांच्या नावे गॅस कलेक्शन असेल तरीही फक्त एकच महिलेला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
  4. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. जर कुटुंबातील महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर ती महिला देखील या योजनेसाठी पात्र असेल पण त्यासाठी आवश्यक की गॅस कनेक्शन हे त्या महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे. जर गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावे असेल तर या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही.

 

महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना अर्ज कसे करावे? (Maharashtra Annapurna Yojana)

महाराष्ट्र अन्नपूर्ण योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे. हेच दस्तऐवज अर्ज करताना महत्त्वाचे असतील.

  • गॅस कनेक्शन च कागदपत्रे : गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणारे कागदपत्रे असणे आवश्यक आहे
  • आधार कार्ड : ज्या महिलेच्या नावे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे आधार कार्ड, ज्या द्वारे महिलेची ओळख निश्चित केली जाई.
  • पॅन कार्ड : योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड : एकाच रेशन कार्ड वर फक्त एकाच महिलेला लाभ मिळवता येणार असल्याने रेशन कार्ड ची प्रत घेणे आवश्यक आहे.
  • बँक खाते तपशील : ज्या बँकेत महिलेचे खाते आहे त्या बँकेचे तपशील आवश्यक आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो : या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे.
  • उत्पन्नाचा दाखला : या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला जमा करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया :

  1. ऑनलाइन अर्ज : महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता. अर्ज करताना वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
  2. ऑफलाईन अर्ज : सर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. तुमच्या जवळील गॅस वितरक केंद्रावर जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता. तिथे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक कागदपत्रे दिली जाऊ शकतात.

Online अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://mahafood.gov.in/website/english/PDS2.aspx

 

PM Kisan Mandhan Yojana, या शेतकऱ्यांना मिळणार 3000 रु प्रतीमहा

महत्त्वाची माहिती :

अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्याची तारीख संबंधित गॅस वितरण केंद्राकडून कळवली जाते.

अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास तुम्ही स्थानिक अधिकारी किंवा गॅस वितरण केंद्रावर संपर्क करू शकता.

आधार कार्ड अपडेट कसे करावे? Aadhar Card Update

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना : 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now