Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे राज्यातील मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी 2023 च्या वार्षिक बजेटमध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) होय.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेमागचे मूळ उद्देश होय.
Lek Ladki Yojana काय आहे?
लेक लाडकी योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत शिक्षणासाठी एकूण 98 हजार रुपये आर्थिक सहाय्य 5 टप्प्यात वितरित करण्यात येते, जे की तिच्या वयानुसार आणि शिक्षणानुसार वेगवेगळी असते.
लेक लाडकी या योजना मुख्य करून मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. एक महत्त्वकांशी अशी योजना आहे ज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासात मदत करण्यासाठी सरकार यामध्ये महत्त्वाची भूमिका मांडत आहे.
योजनेचे नाव – लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana
उद्देश – मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
लाभ – एकूण ₹98,000/- रुपये आर्थिक सहाय्य
लाभार्थी – आर्थिक दृष्ट गरीब कुटुंबातील मुली
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन/ ऑनलाइन
लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट, Lek Ladki Yojana Uddist
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदष्ट्या गरीब कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुलींना जन्मापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य करणे.
- समाजातील मुलीबद्दल असलेले नकारात्मक विचार संपवून गर्भ हत्येवर आळा घालने.
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे व त्यांचे शिक्षण बद्दलचे आवड निर्माण करणे.
- महाराष्ट्र राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे.
- पैसा व्हावी गरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये.
- समाजातील मुलींना स्वावलबी बनवणे.
- मुलींना शिक्षणासाठी व आर्थिक दृष्ट्या बळकट करणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देउन व जन्मदर वाढवणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे व चालना देणे.
- मुलींचे सक्षमीकरण करणे.
- मुलींचा होणारा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- मुलींचे कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण जास्त असून त्यावर आळा घालून प्रमाणा शून्य करण्यासाठी प्रोत्साहन करणे.
लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्ये (Lek Ladki Yojana)
- लेक लाडकी या योजनेचे अर्ज प्रक्रिया सोपे ठेवण्यात आलेली आहे. यामुळे गरीब कुटुंबाला अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
- लेक लाडकी या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट मुलीच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- लाभार्थ्यांची थेट रक्कम बँक खात्यात जमा होत असल्यामुळे आर्थिक गैरव्यवहार टाळले जातात.
- लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यात तसेच उंचावण्यास मदत होते.
-
लेक लाडकी योजनेचे लाभार्थी :
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली.
- पिवळ्यांनी केशरी रेशन कार्डधारक कुटुंब.
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार
लेक लाडकी योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
पहिला टप्पा – मुलींच्या जन्मानंतर
रक्कम -5000/- रुपये
दुसरा टप्पा – मुलगी इयत्ता १ ली मध्ये गेल्यानंतर
रक्कम -6000/- रुपये
तिसरा टप्पा – मुलगी इयत्ता ६ वी मध्ये गेल्यानंतर
रक्कम -7000/-
चौथा टप्पा – मुलगी इयत्ता ११ वी मध्ये गेल्यावर
रक्कम -8000/-
पाचवा टप्पा – मुलीच्या १८ वर्षे झाल्यानंतर नंतर
रक्कम -75000/-
एकूण रक्कम -१,०१,०००
एक लाख एक हजार रुपये
लेक लाडकी योजनेचे फायदे
- लेक लाडकी या योजने अंतर्गत राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते वय वर्ष 18 पूर्ण होईपर्यंत एकूण 98 हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.
- लेक लाडकी योजनेच्या साह्याने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली कुठल्याही अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सामाजिक विकास करू शकतील.
- जेव्हा मुलींचे वय वर्ष 18 पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या बँक खात्यात एकूण 75 हजार रु एकूण डीबीटी (DBT) च्या साह्याने जमा केले जातील जेणेकरून मुलींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत होईल.
- लेक लाडकी योजनेच्या साह्याने समाजात मुलगा मुलगी भेदभाव कमी होण्यास मदत होईल.
- राज्यात होणाऱ्या गर्भात त्या रोखण्यास मदत होईल
- लेक लाडकी योजनेच्या साह्याने मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
लेक लाडकी योजनेची आवश्यक पात्रता व अटी:
- लेक लाडकी योजनेचे अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसणाऱ्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त पिवळ्यांनी केसरी रेशन कार्ड असलेले कुटुंब या योजनेचा लाभ मिळू शकतात.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीय योजनेचे लाभ मिळू शकतात.
- लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीला स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे जर मुलींनी एखाद्या कारणावस्त शिक्षण सोडले तर अशा परिस्थितीत तिला लाभाची रक्कम दिली जाणार नाही.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असता कामा नये.
- दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- पहिल्या अपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असताना माता-पिता यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रस्तुती वेळी जर जुळे अपत्य जन्माला आले असल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता-पिता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसने आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- मुलीचा जन्म दाखला.
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. (यामध्ये वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे).
- तहसीलदार व सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- अर्जदार मुलीचे आधार कार्ड (प्रथम लाभ वेळी ही अट शिथिल राहील).
- मुलीच्या आई-वडिलांचे आधार कार्ड
- मुलीच्या बँक पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) छायांकित प्रत
- पासपोर्ट साईज फोटोस्
- मतदान ओळखपत्र (पाचव्या टप्प्यातील लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला)
- संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
- आई वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
- अंतिम लाभाकरिता म्हणजे पाचव्या टप्प्यातील लाभाकरिता मुलीचे विवाह झाले नसल्याचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
हेही वाचा
लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम लेक लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.
- वेबसाईट वरील होम पेजवर एक लडकीयो जनावर क्लिक करावे
- आता पुढे तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती जोडावे व आवश्यक कागदपत्र अपलोड करावेत.
- या प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता.
लेक लाडकी योजना ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात किंवा महिला व बालविकास विभागात जावे लागेल.
- महिला व बालविकास विभागात जाऊन लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
- भरलेले अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयात जमा करावे.
- याप्रकारे तुम्ही लेक लाडकी योजना चे ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
-
लेक लाडकी योजना अर्ज रद्द होण्याचे मुख्य कारणे
- लेक लाडकी योजना या योजनेचा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवास नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार मुलगी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजना अंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवत असल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदाराने एकाच वेळी दोन अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द होऊ शकतो.
-
- लेक लाडकी योजना हिंदी Information click here
Maharashtra Vidhansabha New MLA List, महाराष्ट्रातील सर्व नवीन 288 आमदार यादी जाहीर.
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया अनुदान, Thibak Sinchan Yojana 2024 MahaDBT
मागेल त्या शेतकऱ्याला विहीर अनुदान 5 लाख रुपये, Vihir Anudan Yojana Maharashtra 2024
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया अनुदान, Thibak Sinchan Yojana 2024 MahaDBT
7 thoughts on “Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना 2024”