Hartalika Vrat Puja in Marathi, हरतालिका व्रत पुजा कशी करावी? 2024

 

Hartalika Vrat Puja

हरतालिका (Hartalika Vrat Puja) व्रत पूजा कशी करावी?

हरतालिका तृतीया: पूजन आणि वृत्त कसे करावे, पूजा साहित्य, मांडणी आणि विधी व्रत कथा.

Hartalika Vrat Puja in Marathi:

संपूर्ण भारतात हरतालिका व्रत पूजा (Hartalila Vrat Puja) केले जाते. पार्वतीला जसा मिळाला तसा चांगला नवरा आपल्याला मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारीका हे व्रत करतात. हा वृत्त भद्रपद शुल्क तृतीयेला केला जातो. महाराष्ट्रात हरतालिका व्रत (Hartalika Vrat Puja) व्रताला विशेष महत्त्व आहे.

हरतालिका तृतीया या दिवशी सुवर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा संपूर्ण भारतात प्रचलित आहे. 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:20 मिनिटांनी भाद्रपद शुल्क तृतीया सुरू होणार आहे. तर 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03:00 वाजता भाद्रपद शुल्क तृतीया या समाप्त होणार आहे.

भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. यामुळे 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळीच हरतालिका पूजा (Hartalika Vrat Puja) करावे, असे सांगितले जात आहे. हरतालिका व्रतासाठी काय तयारी करावी? कोणते साहित्य घ्यावे? हरतालिका व्रत पूजा कशी करावी? हरतालिका व्रताचा सोपी विधी व वृत्तकथा जाणून घेऊयात…(Hartalika Vrat Puja)

 

हेही वाचा:-Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना 2024

 

हरतालिका व्रत पूजा साहित्य (Hartalika Vrat Puja Sahitya):

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, भांडे, पळी, ताम्हन, गंध, पाट, अक्षता, फुले, तुळशी, बुक्का, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरंजन, विड्याचे 12 पाने, कापडाची वस्त्रे, जानवे, 12 सुपाऱ्या, फळे, 2 नारळ, खोबरे, गूळ, बांगड्याचे फणी गळसरी, पंचामृत,(दूध, दही, तूप, मध, साखर) 5 खारका, 5 बदाम इत्यादी सर्व साहित्य पूजनासाठी लागते.

 

हरतालिका व्रत पूजा (Hartalika Vrat Puja) सौभाग्यवाणाचे साहित्य:

तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपारी, आरसा, फनी, 4 हिरव्या बांगड्या, हळद, कुंकू, सुट्टी पाच रुपयाची नाणी, सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास यशा शक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी.

 

हेही वाचा:-Maharashtra Swadhar Yojana 2024, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024, सरकार कडून मिळणार 51000 रूपयाची मदत…

हरतालिका पूजेतील पत्र (Hartalika Vrat Puja):

  1. अशोकाचे पाने
  2. दुर्वाकुर पत्र
  3. कन्हेरीची पाने
  4. आवळ्याची पाने
  5. कदंबांची पाने
  6. धोत्र्याचे पाने
  7. आघाड्याचे पाने
  8. बेलाचे पाने
  9. आणि सर्व प्रकारची पत्रि

 

हरतालिका पूजेतील फुले (Hartalika Vrat Puja) :

  1. केवड्याची फुले
  2. चाफ्याची फुले
  3. बकुळीची फुले
  4. धोतऱ्याची फुले
  5. कनेरीचे फुले
  6. कमळाची फुले
  7. शेवंतीची फुले
  8. जास्वंदीची फुले
  9. मोगऱ्याची फुले
  10. सदाफुलीची फुले

 

(Hartalika Vrat Puja) हरतालिका व्रत पूजा प्रारंभ:

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावेत. विड्याची दोन पाने त्यावर एक नाणे व एकावर सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. घरातील वडील माणसांना व गुरुजींना नमस्कार करूनच आसनावर बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरितालिकाची दोन्ही मूर्ती ठेवावे. वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरतालिका मृत्यू सोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवले तरी चालेल.

  • घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळद कुंकू वाहून प्रथम नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करू नको उद्याचा प्रारंभ करावे.
  • सुरुवातीला काही तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्यांचे आवाहन करून पंचोपचार पूजा सुरू करावी.
  • चौरंग किंवा पाटा यावर मांडून केळीच्या खांबांची चारही बाजू सुशोभित करावी. शिशुभित केलेल्या चौरंगावर पार्वती व शंकराची स्थापना करावी. व त्यांचे षोडशोपचारे पूजा करावी.
  • हरतालिका पूजा करताना ” सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा मलाही मिळू दे, अखंड सौभाग्य मिळू दे, अशी प्रार्थना करावे.
  • अगरबत्ती लावून, धूप, व दीप लावून, आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले वाहवेत. हरतालिका पूजा करत असताना उपमहेश्वराचे ध्यान करावे.
  • पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना नमो भावे नमस्कार करावे. आरती करावी यांनी प्रसादाचे वाटप करावे.

हरतालिका उत्तर पूजा व व्रताची सांगता:

हरतालिका वृत्तामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी. आचमन करून पंचोपराने पूजा करावे. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी यांनी अक्षता वहाव्या. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी पूर्ण करतात.

 

हरतालिका व्रत कथा Hartalika Vrat Puja Katha :

एके दिवशी काय झाले, ईश्वर महादेव व पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले “महाराज सर्व व्रतात चांगला वृत्त कोणता? श्रम थोडे आणि फळ भरपूर, असं एखादं व्रत असेल तर सांगा. आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगावे.”

तेव्हा महादेव शंकर असे म्हणाले “जसा नक्षत्राचा चंद्र श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात नदी गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ वृत्त आहे. हेच तुला सांगतो, तेच तू पूर्व जल मी हिमालय पर्वतावर केला आहे, आणि त्याचा पुण्यानं तू मला प्राप्त केले आहेस,” असे शंकर पार्वतीला म्हणाले.

“ते व्रत भाद्रपद महिन्यातल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलं, ते मी तुला सांगत आहे. पार्वती तू लहानपणी मी तुला प्राप्त हुवा म्हणून मोठं तप केलं. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख तू सहन केलेस. तुझे हे परिश्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं होतं. मात्र अशी कन्या कोणास द्यावी, अशी त्यांना चिंता पडली होती. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाले आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठविले आहेत. म्हणून मी इथं आलो आहे. असे नारद मुनी हिमालयास म्हणाले. हिमालयाला मोठा आनंद झाला होता.  त्यांनी ही गोष्ट कबूल केली.”

“मी यानंतर नाराज म्हणून तिथून निघून विष्णू कडे गेले. त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुजली नाही. तू रागावलीस.”

“असं पाहून तुझ्या सखीने रागवण्यामागचं कारण विचारले असता तेव्हा तू सांगितलेलस की, महादेवावाचून मला दुसरा कोणताही पती करणं नाही आहे. असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याची कबूल केली. याला काय उपाय करावा?  मग तुझ्या सखीने तुला एक घनदाट अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळचे एक मोठी गुहा सापडली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापन केलं. त्याची पूजा केली, तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता.”

“रात्रभर जागरण केलं. त्या पुण्यानं इथे माझे असं हललं, नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिल्या आणि वर मागण्यास सांगितले. तर तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही, नंतर ही गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलेस. सखी सह त्याचं पारणे केलस. एवढ्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारले? मग तूच झालेली सर्व हकीकत सांगितलीस, पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले. अशी या वृत्तान तुझी इच्छा पूर्ण झाली.  यामुळे याला हरतालिका व्रत असं म्हणतात.” असे शंकराने पार्वतीला म्हणाले.

 

हरतालिका विधि (Hartalika Vrat Puja Vidhi):

ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीची खांबे लावून घ्यावीत ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढावे पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारे पूजा करावी. मनोभावी त्यांची पूजा करावी. यानंतर ही कहाणी करावी व त्या रात्री पूर्ण जागरण करावं. यावरताना प्राणी पापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पातक नाहीसं होत असतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायांनी जर काही खाल्लं तर त्याच्या जन्मबंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होऊ शकतो. कहानी केल्यावर सुहासिनींना यशाशक्ती पाणी यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. हे साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी, देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या वारी, सुफळ संपूर्ण!

हरतालिका व्रत पूजा:- https://www.lokmat.com/bhakti/hartalika-tritiya-2024-hartalika-vrat-sahitya-know-about-hartalika-vrat-puja-vidhi-with-mantra-vrat-katha-in-marathi-a-a719/amp/

Haratalika vrat Puja Youtube Video:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now