Chatrapati Shivaji Maharaj Stetue Collapses, 43 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कसा कोसळला?


Shivaji Maharaj

Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Maharashtra! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कसा कोसळला? याला कोण जबाबदार? 

43 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कसा कोसळला? Chatrapati Shivaji Maharaj 43 foot Stetus Collapse.

सिंधुदुर्ग : नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचे जनक (Father of Indian Navi) म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मागच्या वर्षी म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता. आणि नुकत्याच त्या पूर्णाकृती 43 फूट उंच पुतळ्याच काल म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवी नुकसान होऊन पुतळा खाली कोसळल्याचे पाहायला मिळाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे तारकर्ली या समुद्रकिनाऱ्यावर नौदल दिनानिमित्त पंतप्रधान यांच्या हस्ते याचे लोकर पण सोहळा साजरा करण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावरील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Putla) अवघ्या 35 फुटापर्यंत उंचीचा होता.

4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला समुद्र किल्ला सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या साक्षीने साजरा करायचा निर्णय घेण्यात आला होता. यानिमित्ताने राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने व नौदल तटरक्षक दलाच्या वतीने पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता.

 

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळा कसा होता?

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसरात सुशोभीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती!
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची सुमारे जमिनीपासून एकूण 43 फूट एवढी तर पुतळ्याची उंची  35 फूट एवढी होती.
  • या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी  नौसेनेकडून करण्यात आली होती.
  • या पुतळ्याचे उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेनेकडून उभारणी करण्यात आली होती.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी किमान 2 कोटी 40 लाख 71 हजार रुपये एवढा खर्च केला होता.
  • या पुतळ्याचे शिल्पकार म्हणून कल्याणचे तरुण व मालवणचा सुपुत्र असलेले जयदीप आपटे यांनी हा शिल्प बनवले होते

पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभर जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या मते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पुतळा कोसळल्याचे म्हणले आहे. याबद्दल आम्हाला दुःख व्यक्त होत असून या घटनेचे एक शिवप्रेमी म्हणून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. अवघ्या सहाच महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा उभारण्यात आला होता, ज्यावेळी काम चालू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी अनेक तक्रारी करून सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे काम केले गेले असल्याचे माहिती स्थानिक लोक मिळत आहे. चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अनेक किल्ला दुर्ग येथील भिंतीला अजूनही शिरा आलेल्या नाहीत पण अवघ्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या या निकृष दर्जाच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर व देशातील अनेक शिवप्रेमी कडून या घटनेचा निषेध व्यक्त केले जात आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळा का कोसळला?

काही महिन्यापूर्वी भारतात मान्सूनचे आगमन झाले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील मान्सून पावसाने सुद्धा आता जोर धरल्याचे पाहायला मिळते. तसेच सिंधुदुर्ग येथे सुद्धा मागील तीन चार दिवसापासून वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाळ्याच्या सरी कोसळत होत्या. हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती तेथील स्थानिक प्रशासनाकडे दिले. यानंतर तातडीने महसूल व तसेच स्थानिक पोलीस प्रशासन अधिकारी समवेत त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

जमिनीतून उभारण्यात आलेले या पुतळ्याच्या स्थापनेवेळी अनेक लोखंडी अँगल हे अर्धवट असल्याचे दिसून येत आहेत. पुतळा उभारताना थेट जमिनीपासून ते पुतळ्याच्या मध्यपर्यंत अँगल पूर्ण असते तर हा पुतळा कोसळला नसता असा स्थानिक लोकांकडून मत व्यक्त केला जात आहे.

नट बोल्ट गंजले असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून नौदलाला देण्यात आली होती. मात्र यावर तातडीने कोणतेही उपाययोजना करण्यात आले नसल्याचे स्थानिक लोकांकडून कळते.

 

घाई केल्याने पुतळा कोसळला – खासदार छत्रपती संभाजी महाराज

सिंधुदुर्ग मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी घाई केले असल्याची तिखट प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या कडून व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचे उचित स्मारक उभारणे अत्यंत गरजेचे आहे. उशीर झाला तरीही पुतळ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने स्मारक पुनर्बांधणी झाली पाहिजे. निवडणुका आहेत म्हणून निवडणुकीच्या अगोदर पुतळा उभारण्याची घाई आता करू नये असेही खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून घनाघात टीका करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुतळा पुन्हा उभारणार असल्याचे जाहीर.

झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रभर संतप्त व्यक्त केला जात आहे. शिवप्रेमी कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींची अस्मिता असलेल्या पुतळ्याचे अशा झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्रभर ठेस पोहचली असल्याचे दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन पूर्णाकृती पुतळा उभारणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याबद्दल ते बोलताना म्हणाले की, झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आमची अस्मिता आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. या घटनेबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की प्रति तास 45 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहत होते. यामुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पण पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा करू अशी जाहीर प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

  • (Chatrapati Shivaji Maharaj)

Chatrapati Shivaji Maharaj

 

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास :

आपल्या भारत देशामध्ये अनेक वीरांचा जन्म झाला त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली. अशाच वीरांच्या पंगतीत सर्वात अगोदर आणि सर्वश्रेष्ठ म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ.

छत्रपती शिवाजी महाराज भोसले (1630-1680) एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होऊन गेले. शिवाजी महाराजांनी सन 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले. सन 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे शिस्तबद्ध आणि सुसंस्थेचे प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध साम्राज्यात अनेक नवनवीन शोध लावले होते. गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले होते. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था ने न्यायालयाने ने शिष्टाचाराचेपुनर्जीवन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान युद्ध होते. ते मराठा साम्राज्याची राजा होते. महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती म्हणून काम करत होते. महाराजांचे आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभान स्त्री होत्या.

असे म्हणले जाते की जिजाबाईंनी शिवाजी देवीला स्वतःसाठी आणि मातृभूमीसाठी एक बलवान पुत्र देण्यास सांगितले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या पालकांसारखेच होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण त्यांच्या आई मा जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखालीच गेले. माझी सवय यांनी महाराजांना राजकारणांनी युद्धाची प्रशिक्षण दिले. तसेच आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण हे महाराजांना मिळाले. एवढ्या लहान वयातील महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयत स्वराज्याचे ज्योत पेटली होती. त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. महाराजा बरोबर काही शूर आणि खरे मित्र हे होते त्यांनी महाराजांना सुरज स्थापण्यासाठी अपार मदत केली.

स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म शेतीवर झाले परंतु त्यांचे बालपण शिवनेरी सोबतच माहुली यांनी पुण्यातही केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाबाई यांच्याकडे सोपवुन त्यांना पुण्याला पाठवले. चांगली गोष्ट दादाची कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेली काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत होते.

आई जिजाऊ प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देश प्रेमी आणि कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे याचा संपूर्ण ज्ञान होते. अशा अनेक गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईकडून मिळालेले शिकवाल आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत होती. स्वराज्य म्हणजे स्वतःचेच राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायला हवे यासाठी किल्ले हवे तसे महाराजांना वाटू लागले.

हे त्यांना लहान वयातच कळले होते. म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या मावळ्यांना घेऊन पुण्याजवळील आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ल्यांनी डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ला काबीज केला. त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू असे अनेक किल्ले ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण साडेतीनशे किल्ले यापेक्षा जास्त किल्ले स्वराज्य मध्ये सामील केले. मावळ्यांची मिळणारी अपार साथ, मदत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती.

वाचा :- https://timesofindia.indiatimes.com/topic/chhatrapati-shivaji-maharaj

हेही वाचा :- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता व लाभ 2024 : Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024

Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900

Crop Insurance कसे करावे 2024? अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now