Breaking बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख.
काही वेळापूर्वीच नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली असून या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.
अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी…
नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर येथे नरखेड येथील रॅलीची सांगता करून देशमुख तीनखेडा-भिष्णूरमार्गे काटोल येथे परतत असताना अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा माहिती समोर आली आहे.
https://x.com/LokmatTimes_ngp/status/1858541529624645745?t=j1C7dRNGp7st9QwWbgsO2A&s=19
https://x.com/LokmatTimes_ngp/status/1858541529624645745?t=j1C7dRNGp7st9QwWbgsO2A&s=19
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असतानाच अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत, आता त्यांना पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती आहे. हा हल्ला नेमका कुणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलच ढवळले असल्याचे दिसून येत आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याच दिसून येत आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच हल्ला केल्याचा असा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात आता चांगलीच खळबळ उडाली आहे.
Breaking बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख.
काही वेळापूर्वीच नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली असून या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.
अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी…
नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर येथे नरखेड येथील रॅलीची सांगता करून देशमुख तीनखेडा-भिष्णूरमार्गे काटोल येथे परतत असताना अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा माहिती समोर आली आहे.
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असतानाच अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत, आता त्यांना पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती आहे. हा हल्ला नेमका कुणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलच ढवळले असल्याचे दिसून येत आहे. (Anil Deshmukh) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याच दिसून येत आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच हल्ला केल्याचा असा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात आता चांगलीच खळबळ उडाली आहे.