महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha 2024) प्रचारात काय चाललंय हो?

Maharashtra Vidhansabha 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024 (maharashtra vidhansabha 2024)

 

Maharashtra Vidhansabha 2024 : महाविकास आघाडी आणि महायुती प्रचाराची एकंदरीत दिशा मतदारांना किती भावते, आणि कोणाचा किती प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडतो हे पाहण्यायोग्य होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग आला असून सर्व नेत्यांनी कंबर कसून प्रचाराला सुरुवात केली आहे.

 

महाराष्ट्र दोन्ही युती आणि इतर पक्षांची आघाडी.

(Maharashtra Vidhansabha 2024)

महाराष्ट्रातील एकूण प्रमुख सहा पक्षांनी दोन आघाड्यांमध्ये विभागणी करून त्यातून एकूण दोन युती निर्माण झाले आहेत, ज्यामध्ये पहिली युती ही महायुती विरुद्ध तर दुसरी होती ही महाविकास आघाडी अशा थेट लढतीचे चित्र दिसत आहेत. अनेक बंडखोर अपक्षांनी व काही ठिकाणी अन्नपक्षाने उभे केलेले आव्हान अशा टप्प्यावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार येऊन ठेपला आहे.

 

हेही वाचा : ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया अनुदान, Thibak Sinchan Yojana 2024 MahaDBT

विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढती.

(Maharashtra Vidhansabha 2024)

मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी तर युवराज संभाजी राजे बच्चू कडू राजू शेट्टी इत्यादी नेत्यांनी परिवर्तन महाशक्तीकडून रडती तिरंगी व्हावे, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘बहुजन समाज पक्ष’ स्वतंत्रपणे लढतो आहे. तरी महायुती व महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अनेक जागांवर उभे केलेले आव्हान हा निवडणुकीतील एक्स्पेक्टर ठरणार आहे.

 

पक्षधर्म संकट.

(Maharashtra Vidhansabha 2024)

दोन्ही फळ्यामधील म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीही मित्रपक्षांनीही एकमेकाविरोधात काही ठिकाणी दंड थोपटले आहेत. यामुळे युती धर्माचे व आघाडी धर्माचे पालन करण्याच्या शपता घातल्या जात आहेत. एकत्र राहण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न चालू आहे. या सर्वांपैकी सर्वाधिक लक्षवेधी कोणता हा मुंबईतील माहीमचा आहे. राज ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित ठाकरे तिथे नशीब आजमावत आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा वेळी महायुतीला बिनशर्ता पाठिंबा दिला होता. तिची परतफेड व्हायला हवी असे अनेकांचे मत आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या माघारी साठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत. परिणामी भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी धर्माचे पालन करण्याची व सरवणकर यांच्या प्रचाराची भूमिका स्वीकारली आहे. आता प्रचाराच्या घरचे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत देश पातळीवरील झाडून सारेच नेते या होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मागे लागले आहेत. राज्यातील शिलेदार मतदारसंघातील गल्लीबोळा, गाववाडे वस्ती पिंजून काढत आहेत. महिला, तरुण, शेतकरी या सर्व समाज घटकांची तसेच शहरी भागातील मध्यमवर्ग यांचे मने जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही व इतर पक्षाकडून जोरात सुरू आहे.

हेही वाचा : मागेल त्या शेतकऱ्याला विहीर अनुदान 5 लाख रुपये, Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

 

पक्ष प्रचारातील मुख्य मुद्दे.

(Maharashtra Vidhansabha 2024)

 

अशावेळी मागील पंधरा दिवसातील प्रचाराचे मुद्दे आणि त्यांना मतदारांनी दिलेला प्रतिसाद नेत्यांची अनेक मोठी विधाने त्यावरून निर्माण झालेले वाद, युती व आघाडीचा धर्म या सगळ्यांची गोळा बेरीज अगदी लक्षणीय व वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात सोबत झारखंड मध्ये देखील विधानसभा निवडणूक होत आहेत. दोन्हीकडच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे एकच सूत्र दिसून येत आहे. झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोर व त्यांनी माजवलेली कथिक उत्पाद प्रचाराच्या केंद्रस्थानी ठरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र महाविकास आघाडी अल्पसंख्यांकाचे कसे लांगुल चालन करीत आहे त्याला हिंदुत्ववादी पृष्ठभूमी असलेले उद्धवसेनेची कशी साथ आहे हे मतदाराच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न चालू आहे.

 

भाजपचे स्टार प्रचारक व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एरवी व्हाट्सअप ला व्हायरल असणारे ‘बटेंगे तो कटेंगे’ हे आवाहन प्रचारात आणले आहेत. त्याला सुरुवातीला थोडा प्रतिसाद मिळाला पण त्यानंतर स्वतः पंतप्रधानांच्या भाषणातून एक है तो सेफ हे असा नवा नारा वाक्यप्रचारात पुढे आला. दोन्हीचा अर्थ एकच. या घोषणा केल्या काश्मीरमधील 370 कलम हटवण्यात काँग्रेसची आडकाटी, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आला तर हा कलम पुन्हा लागू होण्याची भीती, औरंगजेबाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला घेणे, हे सारे प्रयत्न ध्रुवीकरणासाठी आहेत हे लपून राहिलेले नाही. तथापि भाजपचे नेते असे राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत असताना महायुतीतील अजित पवारांनी सर्वप्रथम हे महाराष्ट्रात चालणार नाही असे म्हटले आहे.

 

त्यानंतर पंकजा मुंडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील अशा या भाजप नेत्यांनी या घोषणांची गरज नसल्याचे सूर आळवला आहे. वरवर हे मतभेद वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे काही नाही, कारण महायुती चे स्थानिक गणिते लाडके बहीण किंवा अन्य लाभांच्या योजनेवर देखील भर देत आहेत. लाभार्थ्यांच्या मते पिढीचा असा प्रयोग उत्तर प्रदेश मध्य प्रदेशात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

मुख्य मुद्दे आणि उद्देश.(Maharashtra Vidhansabha 2024)

महाराष्ट्रातही तो चालेल आणि लोकसभा निवडणुकीतील पिछाडी त्यामुळे भरून निघेल असे या नेत्यांना वाटत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रचार राज्यघटना जातक जनगणना व आरक्षण या राष्ट्रीय मुद्द्यासोबतच महाराष्ट्रातील अस्मिता गुजरातला गेलेले रोजगार त्यामुळे गमावलेले रोजगार व रोजगाराची संधी किंवा गेल्या आठवड्यातील सोयाबीन कापसाच्या भावातील घसरण अशा अनेक मुद्द्यांना उचलून प्रचाराला जोर लावला आहे. यामुळे जनतेमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे, पण या संभ्रमातून जनता कोणाच्या प्रचारी मुद्द्याला पावते हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.

जनतेचा प्रतिसाद (Maharashtra Vidhansabha 2024)

महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची एकंदरीत दिशा महाराष्ट्रातील मतदारांना किती भावते कोणाला कौल मिळतो हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरनार आहे. तर येत्या 20 तारखेला महाराष्ट्रातील सर्व जनतेने मतदान करून महाराष्ट्राचे भविष्य ठरवावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

मुख्य माहिती इथून : https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-assembly-election-2024-full-candidate-list-constituency-party-wise-full-list-of-vidhan-sabha-matadarsangh-umedvar-yadi-maharashtra-politics-marathi-news-1326628

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now