Thibak Sinchan Yojana 2024 : Thibak Sinchan Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे महाडीबीटी हे पोर्टल शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन मंच बनविले आहे. MahaDBT शेतकरी योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे विविध साधनसामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च कमी व्हावा यासाठी अनेक योजना अंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना 50% ते 80% टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच अनेक प्रकारच्या नवीन नवीन योजना आणत असते. अशीच एक नाविन्यपूर्ण आणि महत्वपूर्ण योजना आहे तिचे नाव महाडीबीटी शेतकरी योजना आहे. महाडीबीटी या योजने अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान योजना 2024 ही योजना या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. दीपक सिंचन व तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत 80 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. यालाच Thibak Sinchan Yojana 2024 म्हणून ओळखली जाते.
Thibak Sinchan Yojana उद्देश
- ठिबक सिंचन या योजनेमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
- झाडांची वाढ जलद गतीने होण्यास मदत होते.
- ठिबक सिंचन चा वापर शेतकरी विविध प्रकारच्या शेतीसाठी करू शकतो.
- ठिबक सिंचन योजनेमुळे सर्वात जास्त फायदा हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.
- कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येणारे पाणी सिंचन प्रकारांमध्ये ठिबक सिंचनाचा प्रथम क्रमांक येतो.
अशा अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने ठिबक सिंचन योजना अमलात आणण्याचा विचार केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणामध्ये पडतो, यामुळे कोरडा दुष्काळ, नापिकी आणि बाजार भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट अशा अनेक कारणामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक स्थिती मंदावते. अशा अनेक गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनामार्फत पर्याय म्हणून ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनेमार्फत पाण्याची बचत करून थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचावी व पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात व्हावी याकरिता ठिबक आणि तुषार सिंचन ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविली जात आहे. यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ज्यांना पाण्याची कमतरता आहे त्यांनी अशा योजनेमार्फत 80 टक्के अनुदानाचा फायदा देखील घेऊ शकतात. Thipak Sinchan Yojana 2024
ठिबक सिंचन योजना फायदे : Thibak Sinchan Yojana
पाणी हे सर्व सजीवांसाठी एक जीवनावश्यक मूलभूत स्त्रोत आहे. संजीवांसाठी पाणी हेच जीवन आहे. म्हणून जेव्हा शेती विस्तार प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा ते नैसर्गिक जलस्त्रोताच्या जवळ असते अशा प्रकारे पाण्याचा वापर करून सिंचन करण्यासाठी वापर केला जातो. विविध प्रकारच्या सिंचनाचे फायदे आपण जाणून घेऊयात.
- ठिबक सिंचन योजना याचा वापर केल्याने उत्पादनात 20 ते 200% पर्यंत वाढ होते.
- ठिबक सिंचन च वापर केल्याने पिकांना पाणी समान प्रमाणात दिले जाते, यामुळे पिकांची वाढ सारखीच व जोमदार व जलदरीत्या होत राहते.
- ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे 30 ते 80 टक्के पाण्याची बचत होते.
तसेच ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे त्याच्या फायद्यासोबत काही तोटेही आहेत हेही आपण जाणून घेऊयात.
ठिबक सिंचन योजना तोटे : Thibak Sinchan Yojana
- जर ठिबक सिंचन वापरायचे असेल तर सिंचन साठी स्वच्छ व कचरा मुक्त पाणी असणे गरजेचे आहे, नाहीतर ते अस्वच्छ पाण्यामुळे ठिबक सिंचनचे पाईप्स ब्लॉक होऊ शकतात.
- ठिबक सिंचन चा वापर करताना शेतीच्या अंतर मशागतीला अडथळा निर्माण होऊ शकतो.
- ठिबक सिंचनाची उंदरा सारख्या प्राण्यापासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते, अन्यथा अनेक ठिकाणातून पाईप्स ब्रेक करू शकतात.
- तसेच तीव्र प्रकाशाच्या उष्णतेमुळे नळ्या लवचिक होऊ शकतात व कालांतराने ते खराब होऊ शकतात.
ठिबक सिंचन योजना लाभ, पात्रता, नियम व अटी : Thibak Sinchan Yojana
- सर्वप्रथम लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- तसेच शेतकऱ्यांकडे पाच हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी. पाच हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन नावी असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा व आठ अ असणे गरजेचे आहे.
- ठिबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या शेतामध्ये बोरवेल किंवा विहीर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे. व त्या पाण्याच्या स्त्रोताची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असणे महत्त्वाच्या आहे.
- जर पाण्याच्या स्त्रोताची नोंद नसेल तर ती तलाठी कार्यालयात जाऊन त्याची नोंद करू शकतात. Thibak Sinchan Yojana
ठिबक सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे : Thibak Sinchan Yojana
- लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्यांचे बँक पासबुक
- पॅन कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- चालू वर्षाचा सातबारा
- आठ अ उतारा
- ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदी केल्याचे बिल ( अर्जदाराच्या नोंदणी करिता याची आवश्यकता नाही, अर्ज मंजूर झाल्यानंतर बिल आवश्यक आहे)
- शेतकऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3 फ्री गॅस सिलेंडर, वाचा, Maharashtra Annapurna Yojana, महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना…
-
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया :
- जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेचा अर्ज घरबसल्या करू शकता.
- जर नसेल तर जवळील सीएससी CSC सेंटर भेट देऊन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावे.
MahaDBT अधिकृत वेबसाईट
- MahaDBT या योजनेचे होमपेज वर आल्यानंतर आपल्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगिन असे दोन पर्याय दिसतील.
- जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापर करता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.
- अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याय वरती जाऊन नोंदणी करून घ्यावे.
- नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे, नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
- त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल ते पासवर्ड टाकून चालू मोबाईल नंबर आणि ओटीपी मिळवा व त्यावर क्लिक करून ओटीपी पडताळणी करून घ्यावे व नोंदणी करून घ्यावे.
- अर्जदार नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून घ्यावे. लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणे करून करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड वरील नंबर टाकून आधार लिंक असलेला मोबाईल वरील आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे.
- आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसतील, यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावे.
- वैयक्तिक तपशील मध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे, जात प्रमाणपत्र नसेल तर नाही यावर क्लिक करावे.
- यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा अर्जदार शेतकऱ्यास कोणतेही अपंगत्व असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
- त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड प्रविष्ट करावे. अर्जदाराचे खाते जनधन खाते असेल तर होय करावे अन्यथा नाही या बटनावर क्लिक करून जतन करून घ्यावे
- वैयक्तिक तपशील माहिती भरून घेतल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा. व त्यानंतर शेतकऱ्यांचा कायमचा पत्ता व पत्रव्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाकून घ्यावा.
- यानंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल सर्व माहिती टाकून घ्यावी. कोणत्या जिल्ह्यामध्ये जमीन आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्याला आठ अ उतारा वरती आठचा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा लागेल. व यानंतर शेतकऱ्याच्या नावाची एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपात टाकून घ्यावे.
- जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर त्याचे वेगवेगळ्या सर्वे क्रमांक आणि वेगवेगळे गट क्रमांक टाकून गटामधील क्षेत्र हेक्टर व आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे. यानंतर माहिती जतन करून घ्यावे.
- जर शेतकऱ्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेले असेल तर होय या ऑप्शन वर क्लिक करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
- ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेसाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे ती आपल्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे त्याची माहिती प्रविष्ट करण्यासाठी इतर माहिती सादर करा हे ऑप्शन डॅशबोर्डच्या डाव्या साईडला दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्यावे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर सिंचन स्त्रोत यामध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या चिंतनाचा जो प्रकार असेल तो सिलेक्ट करून घ्यावे, उदा. विहीर, कूपनलिका बोर, कालवड किंवा शेततळे निवडावे.
- सर्व माहिती भरून घेतल्यानंतर पिकाचा तपशील सादर करा या पर्यायावर क्लिक करून घ्यावे, व शेतीमध्ये सध्या असलेले पिकाची माहिती प्रविष्ट करून घ्यावी, व माहिती जतन करून घ्यावे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करून डॅशबोर्ड वरील अर्ज करा यावर क्लिक करून सिंचन साधने व सुविधा यावर क्लिक करावे.
- विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून अर्ज जतन करून घ्यावा.
- यानंतर सर्वात शेवटची स्टेप म्हणजे, शेतकऱ्यांनी केलेला अर्ज शुल्क भरून घ्यावे, मुख्य पृष्टवर आल्यानंतर परत एकदा अर्ज करा या बाबीवर क्लिक करून घ्यावे, यानंतर आपल्याला अर्ज समोर दिसेल त्यामध्ये त्यांना सिरीयल क्रमांक देऊन शुल्क भरा या ऑप्शनवर क्लिक करावे.
हेही वाचा :
3 thoughts on “ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया अनुदान, Thibak Sinchan Yojana 2024 MahaDBT”