Crop Insurance कसे करावे 2024? अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान?

Image with Meta AI

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान? ७२ तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स करून घ्या…

मागच्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीबरोबर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेले पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चांगलाच वैतागला आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲप वापरून नुकसान भरपाईची माहिती लवकरात लवकर विमा कंपन्यांना कळविण्यास सांगितले आहेत.

‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) या गुगल प्ले स्टोअर वरील ॲप वरून आपल्याला आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती भरता येऊ शकते. जर विमा कंपन्यांना आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती न भेटल्यास आपण विमा मिळवण्यास मुकले जाऊ शकतो.

पिक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अतिवृष्टी झालेल्या भागाचा फोटो आणि इतर आवश्यक माहिती 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळविणे अत्यंत गरजेचे आहे. ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) करण्यासाठी शेतकऱ्याला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करावे लागेल.

 

‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲप कसे वापरावे?

  1. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲप डाऊनलोड करावे.
  2. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर ‘continue as guest’ हा पर्याय निवडावा.
  3. ‘Crop loss’ ऑप्शन निवडून ‘crop loss informtion’ हा पर्याय निवडावा.
  4. यानंतर आपल्या मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी सादर करावा.
  5. हंगाम वर्ष आणि राज्य निवडून पॉलिसी क्रमांक भरावे.
  6. पीक नुकसानीचे तपशील भरावेत, जसे -झालेल्या घटनेचा प्रकार, दिनांक, पीक वाढीचा टप्पा, नुकसान टक्केवारी
  7. यानंतर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो घ्यावा व सबमिट करावे.

अशाप्रकारे शेतकऱ्यांनी ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) हा ॲप वापरून सर्व काही माहिती आपल्या मोबाईलद्वारे अपलोड करू शकतात. यामुळे नुकसानीची माहिती लवकरात लवकर विमा कंपनी पर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यास मदत होते.

 

विमा कंपनीला लवकरात लवकर नुकसानीची सूचना देण्याचे काम शेतकऱ्यांनी करावे, कारण या पूर्वसूचनेत नमूद केलेले ७२ तास संपण्याआधीच कंपनी पुढील कारवाई करू शकते. नुकसान झालेले क्षेत्राचे पूर्ण क्षत्रिय तपासणी व्हावी यासाठी ही माहिती लवकर दिली गेली पाहिजे. यानंतर केलेल्या तपासणीनुसार शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो.

 

अनेक वेळा शेतकरी तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन माहिती भरू शकत नसतील. अशावेळी ते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या तालुका प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाइन अर्ज दाखल करावे. जेणेकरून जेव्हा शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे अर्ज ऑनलाईन भरता येत नाही तेव्हा शेतकरी ऑफलाइन प्रकारे ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ची माहिती भरू शकेल.

हेही वाचा :- Shetkari Yojana 2024, शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र, 90% पर्यंत सबसिडी

शेतकऱ्यांना ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) हे ॲप वापरण्यास सोपे जावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून या संबंधित जागृती मोहीम राबविली जात आहेत. गावागावामध्ये कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14447 देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना मोबाईल ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) याच्या माध्यमातून नुकसानीची पूर्वसचना देण्यासाठी प्रवक्त केले जात आहे. कारण आमच्या माध्यमातून माहिती देताना शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. अशाप्रकारे माहिती ह बरोबर भरता येते.

 

‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲपच्या माध्यमातून नुकसानीची माहिती देण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या:

  • ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲप मध्ये घटनेचा प्रकार ‘Excess Rainfall’  किंवा ‘Inundation’ म्हणजेच अतिवृष्टी किंवा पूर हा पर्याय निवडावा.
  • पीक वाढीचा टप्पा ‘standing crop’ म्हणजे शेतात उभा असलेला पीक पर्याय निवडावा.
  • नुकसानीची टक्केवारी (Damage Percentage) ठीक जमली नाही तर ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲपद्वारे सुधारित करण्यात येतील.

‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) ॲपद्वारे नुकसानीची माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर (Docket ID) डॉकेट आयडी मध्ये सर्व माहिती साठवलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तो डॉकेट आयडी जपून ठेवणे गरजेचे आहे. डॉकेट आयडी पुढे कोणत्याही वेळी उपयोगी पडू शकतो.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांनी हातभार लावला असल्याचे लक्षात येते. अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत मिळावी म्हणून शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance)  ॲपचा वापर करण्यास प्रवक्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यास मदत होते.

क्रॉप इन्शुरन्स या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यास मदत होते. तसेच नुकसानीची माहिती ही वेगाने पोहोचविण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत या गोष्टी त्वरित झाल्याने मदत मिळण्यास अडचणी येत नाहीत. पिक विमा या योजनेमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होण्यास मदत होते.




 

 

हेही वाचा:-  महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता व लाभ 2024 : Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024

‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) कसे करावे?

शेतकऱ्यांना ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) कसे करावे याची संपूर्ण माहिती वरी उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना ‘क्रॉप इन्शुरन्स’ (crop Insurance) करण्यासाठी आपल्या मोबाईल स्मार्टफोनचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. आपल्या स्मार्टफोन द्वारे शेतकरी क्रॉप इन्शुरन्स करू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय आपल्या पिकाचे झालेले नुकसान त्वरित शासनाकडे देण्यास मदत होते. आणि झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामा होऊन विमा मिळण्यास वेळ लागत नाही.

शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतात. यामुळे क्रॉप इन्शुरन्स या पद्धतीने अतिवृष्टी झालेले नुकसानीची भरपाई मिळण्यास देखील शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व मदत मिळण्यास विलंब होणार नाही.

हेही वाचा:- Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना 2024

Crop Insurance YouTube Video https://youtu.be/F3e1qV5uJaU?si=ow7FSmYdx699Bl2q.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now