Sherakari Yojana 2024 शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र 2024 – महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील बहुतांश लोक शेतीचे काम करतात. नविन Shetkari Yojana 2024 यामुळे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्यासाठी नेहमीच मदत करण्यासाठी प्रयत्नशील असते. तर आज आपण अशाच शेतकरी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक पैसे कमविण्यास मदत करणे किंवा विविध योजनेचा लाभ मिळवून घेणे आहे.
शेतीमालाच्या पुरवठ्याची व शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्यांची किंमत सतत वाढत असल्यामुळे, बहुतांश शेतकऱ्यांना त्याची गरज भागवणे खूप कठीण वाटू लागले आहे. यामुळेच महाराष्ट्र सरकारने नवीन योजना कार्यक्रम सुरू केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चासाठी मदत म्हणून दरवर्षी 6000 रुपये देऊ करत आहेत. shetkari Yojana 2024 अंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र 2024 (Shetkari Yojana 2024)
- एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र
- 10 शेळ्या व 1 बोकड गट वाटप योजना महाराष्ट्र
- ट्रॅक्टर अनुदान योजना
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- ठिबक सिंचन अनुदान योजना महाराष्ट्र
- नमो शेतकरी सन्मान योजना
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र
एक शेतकरी एक डीपी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यवसायामध्ये आणि पीक उत्पन्नात वाढ व्हावे यासाठी आहे. पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी व सुरळीत वीजपुरवठा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला डीपी पुरवठा करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला डीपी अशी योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणून एक शेतकरी एक डीपी ही योजना महाराष्ट्रात चालू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना विजेच्या गरजा पूर्ण करता यावे यासाठी राज्य सरकार अनेक उपक्रम राबवत आहे त्यातील एक उपक्रम म्हणजे एक शेतकरी एक डीपी योजना होय. यासाठी महाराष्ट्र सरकारने एक शेतकरी एक डीपी योजना 2023 सुरू केली आहे. एक शेतकरी एक डीपी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठ्याशी संबंधित कोणतेही विद्यमान समस्येचे निराकरण करून वीजपुरवठ्याचा खर्च व्यवस्थित आणि कमी खर्चामध्ये करून डिझाईन करण्यात आला आहे.
एक शेतकरी एक डीपी योजना उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट वितरण नेटवर्कमध्ये शास्वत वीजपुरवठा प्रणाली लागू करून शेतकऱ्यांसमोर विजेच आव्हानांना तोंड देणे हे आहे. या योजनेमुळे उत्पादकता वाढवणे आणि व्यवसाय वाढीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक विद्युत उपकरणांची सुसज्ज उभारणी करून शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करणे आहे. विद्युत धोक्याची संबंधित अपघात, वीज चोरी, वारंवार खंडित होणारे वीज प्रवाह, कमी दोबाच्या विजयमुळे अपुरा दाब पडणे, खराब झालेली स्विच गिअर आणि तांत्रिक वीज हानी यासारख्या समस्येचे निराकरण करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्दिष्ट आहे.
10 शेळ्या आणि 1 बोकड वाटप योजना
महाराष्ट्र शासन शेळी पालन योजना, योजना सामान्यतः महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे, ही योजना अशी आहे ज्यामध्ये दहा शेळ्या आणि एक बोकड या योजनेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागांनी महाराष्ट्र शासन यांच्याकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही योजना राज्य सरकार यांनी जिल्हा या दोन्ही स्तरावर कार्यरत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. या योजनेचे सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी संबंधित कर्ज सरकारी अनुदानित पात्रता निकष अटी आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन माहिती घेणे गरजेचे आहे.
या योजनेच्या कार्यक्रमासाठी विचारात घेतलेले व्यक्तीची यादी पाच वर्षाच्या कालावधीसाठी विचारात घेतली जाते. वरी दिलेली योजना महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका काटक मंडळ येथे राहणारे व्यक्तींसाठी विहिरीत नाहीत. ही योजना फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्या रहिवासींनाच आहे. ही योजना मुख्य करून शेतकऱ्यांसाठी व शेतीपूरक व्यवसाय सोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच चालू करण्यात आले आहे. यामुळे याचा लाभ फक्त शेतकरी बांधवांना घेता येईल. (Shetkari Yojana 2024)
ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. यातीलच योग योजना ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणून ओळखली जाते. यामध्ये सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी महत्त्वाची साधने खरेदी करण्यासाठी पैसे देऊन मदत करते. यामध्ये ट्रॅक्टर किंवा त्याच्या उपकरणाचा समावेश आहे. जे शेतीच्या विकासासाठी खरोखर महत्वाची आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त दरात विकत घेण्यासाठी अधिक पैसे कमवण्यासाठी सरकार या उपकरणावर सवलत देत आहे.
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी महत्त्वाची साधने विकत घेण्यासाठी पैसे देऊन मदत करत आहे. जेणेकरून शेतकरी कमी गुंतवणुकीमध्ये शेती व्यवसायात भरभराटी आणून चांगली पिके घेऊ शकतील हाच यामागचा मुख्य उद्देश होय.
(Shetakari Yojana 2024) महाराष्ट्र सरकारकडे MahaDBT ट्रॅक्टर योजना नावाची एक योजना राबवली जाते. जो शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीत शेतकरी उपयोगी साधने खरेदी करतो. यासाठी सरकार ट्रॅक्टर, पॉवर टिलर, आणि कम्बाईन हार्वेस्टर करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक यांत्रिक खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीच्या कामात मदत करणे सोपे होते.
हेही वाचा – Maharashtra Swadhar Yojana 2024, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024, सरकार कडून मिळणार 51000 रूपयाची मदत…
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान 2024
जुलै 2015 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेला मंजुरी मिळाली. यामध्ये पाच वर्षासाठी म्हणजे (2015-16 ते 2019-20) या काळात 50 हजार कोटी रुपयाची सरकारकडून बजेटची सोय करण्यात आली होती.
अनेक मोठे गुंतवणुकी एक समान आणणे, हर खेत को पानी या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राचा विस्तार करणे, शेतकऱ्यांच्या वापरण्याची कार्यक्षमता वाढून पाण्याचा उपयोग रोखणे, योग्य सिंचन पद्धत आणि पाणी वाचवणे या तंत्राचा अवलंब करणे, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे आजही ही योजना राबविण्यात येत आहे. आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबायचा बचाव करणे हा या मागचा मुख्य उद्देश होय.
महाराष्ट्र सरकारला राज्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी चांगले मार्ग देऊन मदत करायची आहे आणि सिंचनासाठी प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना हा उपक्रम राबविणे हा या मागचा मुख्य उद्दिष्ट होय.
शेती हे एक उद्योग काम आहे जे राज्यातील अनेक लोक दुर्ग काळापासून करत आहेत. मात्र आता पूर्वीसारखा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यास त्रास होत आहेत. त्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी भरपूर पाणी लागत आहे, पण पुरेसे पाणी उपलब्ध नाही, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमत्री कृषी सिंचन योजना या नावाखाली नवीन उपक्रम सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाण्याची बचत करण्यास मदत होईल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिके चांगले वाढविण्यासही मदत होईल.
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना शेतकऱ्यांना विशेष सिंचन तंत्र वापरून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिके घेण्यास मदत करते. त्यामुळे पाण्याची अधिक बचत होते आणि जमिनीला शेतीसाठी पाणी मिळण्यास मदत होते. (Shetkari Yojana 2024)
ठिबक सिंचन अनुदान योजना 2024
अनेक दुसरे प्रकारचे सबसिडी इतर शेतकऱ्यांना आहे. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहेत, त्यांना 45% सबसिडी मिळत आहे. याचा अर्थ असा होतो की त्यांना उपकरणाच्या एकूण किमतीच्या केवळ 45% रक्कम भरावे लागत आहे. ठिबक आणि मिस्टर इरिगेशनसाठी दोन प्रकारचे अनुदानही दिली जातात.
पहिला प्रकार आहे ज्या शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात जमिनी आहेत किंवा जो शेतकरी अल्पभूधारक आहे त्यांना 55% सबसिडी मिळते. याचा अर्थ असा होतो की जर त्यांनी ठिबक आणि मिस्ट इरिगेशनची उपकरणे दहा हजार रुपयाला विकत घेतले तर त्यांना त्या रकमेच्या 45 टक्के रक्कम भरावी लागेल म्हणजे त्यांना एकूण 4500 रुपये इतकीच रक्कम भरावी लागेल. सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आवश्यक असलेले ठिबक आणि मिष्टरिगेशन उपकरणाचे एकूण खर्चातून काही पैसे मिळतील. अधिक माहितीसाठी सरकारी वेबसाईटला भेट द्यावी.
नमो शेतकरी सन्मान योजना
नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत भारतातील अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी मदत केली जाते. महाराष्ट्र हा भारतातील एकमेव राज्य आहे तिथे 1.5 कोटी शेतकऱ्यांना एकूण 6 हजार रुपये दिले जातात. 2023 26 या अर्थसंकल्पात सादरीकरण यावेळी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी या योजनेची घोषणा केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेला नमो शेतकरी महा सन्माननीय योजना म्हणून ओळखले जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये इतकी निधी दिली जाते. (नमो shetkari Yojana 2024)
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या…
- महाराष्ट्र ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात अगोदर अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/login/logi
- जर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन केले नसेल तर नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथे वापर करता आयडी (username) आणि पासवर्ड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करा.
- लॉक इन झाल्यानंतर तुम्हाला नवीन interface दिसेल, तेथे तुम्हाला “अर्ज करा” असा बटन दिसेल त्यावर क्लिक करा
- यानंतर पुढे तुम्हाला एक इंटरफेस दिसेल तिथे तुम्हाला “कृषी यांत्रिकीकरण” दिसेल त्यावर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल मुख्य घटक तिथे ” कृषीयांत अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य” ऑप्शन सिलेक्ट करावे. Wheel drive प्रकार 4 wd निवडा, अशा प्रकारची माहिती पाहून सबमिट करा.
अशाच अनेक योजनांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील लिंक वर क्लिक करावे व अधिक माहिती मिळवावी. Shetkari Yojana 2024 अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
YouTube News शेतकरी योजना
2 thoughts on “Shetkari Yojana 2024, शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र, 90% पर्यंत सबसिडी”